एकनाथ शिंदे नाराज असल्याचे राऊतांनी केले कबुल

एकनाथ शिंदे नाराज असल्याचे राऊतांनी केले कबुल

विधानपरिषद निवडणूक आणि राज्यसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. शिवसेनेचे एकनिष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह अनेक आमदार गुजरातमध्ये आहेत. यादरम्यान, शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेसह शिवसेनचे आमदारांना फसवून गुजरातमध्ये नेले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, एकनाथ शिंदेंची बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठा आहे. ते कुठे जाणार नाहीत. काही नाराजी नक्की आहे, बोलून दूर करता येईल असेही राऊत म्हणाले.

परिषदेत राऊत म्हणाले, शिवसेनाला दुबळी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकनाथ शिंदेंसह २१ आमदारांना गुजरातमध्ये घेऊन गेले आहेत. याच नेतृत्व गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष आर.सी. पटेल हे करत आहेत. या आमदारांना फसवून गुजरातला नेले जात आहे असे राऊत म्हणाले. या आमदारांवर देखील यावेळी राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणाले, स्वतःला विकणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मात्र, असं करण्यापूर्वी भाजपाला शिवसेनेशी लढावं लागेल आणि शिवसेना यातून बिथरणार नाही आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे २८ आमदार फुटले

१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत

“पराभवानंतर सरकार म्हणून विचार करण्याची गरज”

‘वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री- देशमुखांचा दबाव’

तसेच यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीला दाखल झाले आहेत अशीही माहिती राऊतांनी दिली आहे. एकनाथ शिदेंबद्दल राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे निष्ठावंत आहेत. त्यामुळे थोडीशी काही नाराजी असेल तर त्यांची नाराजी चर्चा करून दूर केली जाईल. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिंदेनीसुद्धा शिवसेनेचे उमेदवार विजयी व्हावे यासाठी प्रयत्न करत होते. महाराष्ट्राचा हा गैरसमज आहे आमचे सर्व आमदार पुन्हा परत येतील, असा दावा राऊतांनी केला आहे. तसेच यावेळी शरद पवारांशी चर्चा सुरु असल्याचे राऊतांनी सांगितले. ते म्हणाले, शरद पवार दिल्लीत असून दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी सुरु आहेत.

Exit mobile version