येणाऱ्या सरकारला संजय राऊतांनी दिल्या शुभेच्छा

येणाऱ्या सरकारला संजय राऊतांनी दिल्या शुभेच्छा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर राजकीय वर्तुळात यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमिवर शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व संयमी आणि सभ्य होते. काल त्यांनी राजीनामा दिला कारण आपल्याच लोकांनी दगाबाजी केलीय, असं संजय राऊत म्हणाले. तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या नव्या सरकारला संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का दिला याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे. आपल्याच लोकांनी पाठित खंजीर खुपसला. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर खुर्चिला चिटकून राहणे बरोबर नव्हते. म्हणून त्यांनी राजीनामा दिला, असे संजय राऊत म्हणाले. आमच्या हाडाचे शिवसैनिक तिकडे गेले याचे आम्हला दुःख आहे. येणाऱ्या नवीन सरकारने राज्याच्या हितासाठी काम करावे. आज मी शिवसेनेचे मीठ खातोय मी उद्या पळून जाणार नाही. मी उद्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहे. कोणत्याही प्रकारची माझ्यावर कारवाई झाली तरीही मी सामोरे जाणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी येणाऱ्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा:

‘आता हे सरकार २५ वर्षे चालेल’

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर

कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द; बहुमत चाचणीची आता गरज नाही

दरम्यान, काल उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे संवाद साधून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आभार देखील मानले.

Exit mobile version