विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपाने मोठा विजय मिळवला. यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला मोठा दणका मिळाला आहे. शिवसेनेचे तीसहुन अधिक आमदार फुटले असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यावरून भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेत जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शिवसेनेकडे धमक नाही, अशी गंभीर टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
सरकार गडगडणार आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर प्रवीण दरेकर म्हणाले, राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ कधीच आली आहे. सरकार कधी नीट चालत होत? असा सवाल त्यांनी केला आहे. आमदार लोकांचं प्रतिनिधित्व करतात. आमदार नाराज म्हणजे हा जनतेचा आक्रोश आहे.
या सरकारच्या नेतृत्वात आमदारांची नाराजी दूर करण्याची धमक नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांची नाराजी असं ही मोठी बातमी आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आणि आमदारांना या सरकारचा उबग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसारखं जनतेला नेतृणत हवं आहे, असे दरेकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत
“पराभवानंतर सरकार म्हणून विचार करण्याची गरज”
‘वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री- देशमुखांचा दबाव’
“एकनाथजी योग्य निर्णय नाहीतर आनंद दिघे झाला असता”
पुढे ते म्हणाले, बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचे नेते निष्ठावंत होते. मात्र या सरकारने सत्तेसाठी लोकांचं हित डावलले. लोकांची आणि जनतेसाठी काम करण्याऱ्या आमदारांची यामध्ये हेळसांड होत आहे. त्यामुळेच शिवसेनेवर ही परिस्थिती ओढावली आहे, अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे. तसेच, यावेळी, विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने जो काही विजय मिळवला आहे. त्याचे संपूर्ण श्रेय दरेकरांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे.