‘सोनिया सेना मग शरद सेना आता रडकी सेना’

‘सोनिया सेना मग शरद सेना आता रडकी सेना’

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती होण्यासाठी देशातील जे पक्ष पाठिंबा देतील त्यांचे आम्ही स्वागत करू, अशा पक्षाचं जनतासुद्धा स्वागत करेल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या दाबावामुळे द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्यास तयार झाले, अशी उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे. मुलगा बळजबरीने अभ्यास करून जर मेरिटमध्ये येत असेल तर त्याच्या गुणपत्रिकेला दोष देण्यात काहीही अर्थ नाही, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी उद्धव यांच्यावर केली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे अस्सलाम वालेकुम असे म्हटले म्हणून उद्धव ठाकरे त्यांच्यावर रागवले अशा बातम्या येत होत्या. यावर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले,हा असा प्रसंग दुर्दैवी आहे. इतक्या मोठ्या स्तरावरचा नेता अशी दंतकथा करतो. राजनाथ सिंह हे एक राष्ट्रभक्त आहेत. त्यांनी देशाला आपलं जीवन अर्पित केले आहे. ज्यांच्या रक्ताच्या कणा कणात राष्ट्रभक्ती आहे, अश्या नेत्यांच्या बाबतीत दंतकथा केली. याआधी अडीच वर्षांपूर्वी अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला. त्यांच्या या वक्तव्याला कुणीही साक्षीदार नव्हतं, अशी खोटी माहिती दिली होती. तर आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार संपर्कात आहेत अशी खोटी माहिती उद्धव यांनी दिली होती. अशी खोटी माहिती देणं किंवा एखाद्या नेत्याबद्दल भाष्य करणं हे अशोभनीय आहे, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

एमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार राजीनामे

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्बफेक

कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’!

उद्धव ठाकरेंना धक्का; सदा सरवणकरांचा विभागप्रमुखपदाचा राजीनामा

पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि संजय राऊत यांचा सल्ला घेतात. आम्ही शेवटचा सल्ला २४ ऑक्टोबर २०१९ साली देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी जीवापाड प्रिय विचारणीच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय केला. २८ नोव्हेंबरला २०१९ ला शपथ घेऊन शिवसेनेचा प्रवास हा सोनिया सेना मग शरद सेना आणि आता रडकी सेना असा प्रवास सुरु आहे, अशी सडकून टीका सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

Exit mobile version