उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या चिन्हाबद्दल नवे आवाहन केले. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना देखील खात्री पटली आहे की, मूळची शिवसेना आम्ही आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नव्या चिन्हाची तयारी सुरु केली आहे, असे आमदार शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
उठाव करण्यापूर्वी आणि उठावानंतरही आम्ही उद्धव ठाकरेंना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडावी, अशी आम्ही विंनती केली होती. आपाली युती नैसर्गिक रित्या भाजापाशी आहे त्यांच्यासोबत जाऊ पण तस झालं नाही. त्यांनतर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. तसेच उद्धव ठाकरेंना ही खात्री झालीय आमचीच शिवसेना मूळची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पदधकाऱ्यांना नवे चिन्ह मिळाल्यास ते घरोघरी पोहचवा असे आवाहन केले आहे, असे शुंभुराज देसाई म्हणाले आहेत.
भाजपासोबत जायला हवं, असं आम्ही वारंवार सांगत होतो, असंही शंभुराज म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की, आम्ही २०१९ पासून उद्धव ठाकरेंना सांगत होतो की आपण भाजपासोबतच जायला हवं. आम्ही खूप प्रयत्न केला. शिंदे साहेबांनीही आग्रह केला. पण पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे नाईलाजाने आम्हाला मविआमध्ये राहावं लागलं. पण शिवसेनेच्या आमदार, खासदारांची गळचेपी सुरू होती. अजूनही आम्ही सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचे जवळचे संबंध आहेत. पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंना धाकट्या भावाप्रमाणे मानतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मोदींना विनंती केली तरी मार्ग निघू शकतो. त्यामुळे आत्ता उद्धव ठाकरेंनी आमच्या गटाला मोठ्या मनाने आशीर्वाद द्यावेत. हा एक सन्मानजनक मार्ग आहे, असंही शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘चिन्ह’ जाणार?
पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाराणसीमध्ये १ हजार ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला
तसेच आदित्य ठाकरे हे टीका करत आहेत. यावर शंभूराज म्हणाले, आदित्य ठाकरे हे सन्मानयीय उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. त्यामुळे त्यांनी संजय राऊत यांच्यासारखी भाषा वापरू नये.