भारतीय जनता पार्टीने येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी केली असून, ‘मिशन ४८’ची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली दिली आहे. सध्या भाजपाच्या ताब्यात नसलेल्या मतदारासंघावर जास्त लक्ष देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
२०२४ ला देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा आणि मोदींनी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवा, असा संदेश यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. येणाऱ्या १७ ते १८ महिन्यात लोकसभा निवडणुकांसाठी कसं काम करायचं असं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर जनतेसोबत काम करायचं आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. राज्यात असलेल्या ४८ पैकी ४८ लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत, असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
‘या’ कारणासाठी पंतप्रधान मोदी जाणार गांधीनगरला
केतकी चितळेला जामीन; पोलिस महासंचालकांना नोटीस
उत्तर प्रदेशात ‘बुलडोझर कारवाई’ थांबविण्यास न्यायालयाचा नकार
‘मलिकांचं मंत्रीपद रद्द करा’ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
यावेळी फडणवीसांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सध्या काँग्रेस करत असलेले आंदोलन चुकीचं आहे. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी चालू आहे, त्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. काँग्रेस न्यायालयावर दबाव आणण्याचं काम करत आहे. त्यांचे सुरु असलेले आंदोलन पूर्णतः चुकीचे असल्याचे, फडणवीस म्हणाले आहेत.