‘आज्ञेचे पालन म्हणून, उपमुख्यमंत्री झालो’

‘आज्ञेचे पालन म्हणून, उपमुख्यमंत्री झालो’

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यांनंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या प्रेस क्लबला आमंत्रित केलं होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. शिंदे- फडणवीस राज्यात एकत्र विकास करणार असे यावेळी फडणवीस म्हणाले आहेत. तसेच त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री झाल्यांनतर देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जंगी स्वागत झाले आहे. त्यांनतर त्यांना प्रेस क्लबला आमंत्रण होते. त्यावेळी त्यांनी नागपूर माझी जन्मभूमी कर्मभूमी असल्याचे सांगितले आहे. फडणवीस म्हणाले, अडीच वर्षापूर्वी सत्ता आली नाही, याचे दुःख झाले नाही. पण या महाविकास आघाडीने महाराष्ट्राच्या विकासाला आडकाठी घातली होती. मविआने विदर्भ आणि मराठवाड्यावर प्रचंड अन्याय केला आहे. विकासाचा सर्व योजना मविआने बंद केल्या. शेतकऱ्यांसाठी असलेले सर्व प्रोजेक्ट मविआने बंद केले. मविआने सामान्य नागरिकांची स्वप्न पूर्ण केली नाहीत, अशी टीका यावेळी फडणवीसांनी केली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कोरोना महामारीच्या परिस्थितीची आठवण करून दिली. ते म्हणाले, कोरोना काळात विरोधी पक्षनेता म्हणून अनेक कामे केलीत. मला कोरोना झाला तेव्हा मी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर लगेच बरा होऊन लोकांसाठी कामे केलीत. त्यावेळी शिवसेना अस्वस्थ होती. लाइव्ह संवाद साधत होती. त्यांच्यासोमर रोज हाच प्रश्न असायचा की लोकांना काय उत्तर द्यायचे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जावं लागलं तर शिवसेना बंद करेल पण उलट सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून शिवसेनेने महाविकास आघाडी केली, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. पण मी उद्धव ठाकरे यांचा सन्मान करतो. राजकीय भूमिका आणि उद्धव ठाकरे वेगळे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

शिवसनेच्या आमदारांनी बंड केले असे म्हटले जात आहे. पण त्यांनी बंड नाही तर उठाव केला. शिवसेनेचा विचार पुढे नेण्यासाठी यांनी उठाव केला. त्यांना फक्त भाजपाने साथ दिली. आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केला नाही. आग्रह केला असता तर मुख्यमंत्री पद मिळालं असतं. आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता. मी म्हटल म्हणून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

मुस्लिमांची संख्या ७५ टक्के म्हणून शाळेतील प्रार्थना बदलली!

डबघाईला आलेल्या पाकव्याप्त काश्मीर सरकारने खरेदी केल्या आलिशान गाड्या

चिनी कंपनी विवोवर ईडीची मोठी कारवाई

‘लक्ष्य ऑलम्पिक मिशन’ सदस्य समितीमध्ये आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती

प्रथम देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळात येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यावरून त्यांच्यावर टीका केली जात होती. याचे उत्तर त्यांनी दिले आहे. फडणवीस म्हणाले, मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी बाहेर राहून सरकारला मदत करेन असचं मी सांगितलं होत. माझी तयारीही नव्हती पद घेण्याची. पण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सरकार चालत नाही, असे जे. पी नड्डा आणि अमित शहा यांचं मत होत. त्यामुळे त्यांच्या आज्ञेचं पालन करत मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. आता आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गाच उद्घाटन करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.

Exit mobile version