राज्यात २०१९ साली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतरसुद्धा भाजपासोबत युतीची चर्चा सुरू होती. मात्र, नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंह रजपूत प्रकरणी आरोप केले आणि उद्धव ठाकरे नाराज झाले.त्यामुळे या युतीची चर्चा पुढे गेली नाही. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात याबाबत संवाद सुरु झाला. नंतर त्यांची भेट झाली. मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.
आज, ५ ऑगस्टला दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आहेत. एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवा, आपण एकत्र येऊ, असं उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्याला सांगितले होते. पण याला भाजपा तयार नव्हता, असा खुलासा केसरकरांनी केला आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच
थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू
प्रवाशांच्या सेवेत येणार ‘बेस्ट’ वातानुकूलित डबल डेकर
लालबागच्या राजाला युट्यूबकडून ‘चांदीचा मान’
पुढे ते म्हणाले, सुशांत सिंह रजपूत प्रकरणात नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत सांगितले होते. त्यानंतर याबाबत पंतप्रधान मोदी व ठाकरे यांच्यात संवाद सुरू झाला. नंतर त्यांची भेटसुद्धा झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार होते. पण त्याचवेळी १२ आमदारांचे निलंबन झाले आणि राणे यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या नारायण राणेंना मंत्रिपद दिल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले. ही गोष्ट दोन-तीन लोकांना माहिती होती. त्यात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेही होत्या, असा मोठा खुलासा दीपक केसरकर यांनी केला आहे.