27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणएकाही तालुक्यात दुष्काळी स्थिती नाही म्हणजेच निसर्गही आमच्यासोबत

एकाही तालुक्यात दुष्काळी स्थिती नाही म्हणजेच निसर्गही आमच्यासोबत

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

Google News Follow

Related

बुधवार १७ ऑगस्टपासून राज्यच पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्याआधी आज, १६ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला शिंदे फडणवीस सरकराने चहापान कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एकाही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच स्थगिती या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात एकाही तालुक्यात दुष्काळी स्थिती नाही आणि ही बाब दुर्मिळच म्हणावी लागेल. यावरूनच दिसत निसर्गानेही आमच्या सरकारला साथ दिली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी काही मुद्दे आपल्या पत्रकार परिषदेत मांडले. ४० दिवसांत आमच्या सरकारने ७५० निर्णय घेतले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत येताच शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय सरकराने घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

पुढे ते म्हणाले, आमचं सरकार एका भूमिकेतून, बाळासाहेबांच्या भूमिकेतून त्यांच्या विचाराचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. आमची भूमिका जनतेला पटली नसती तर आज राज्यभरात आमचं, आमच्या आमदारांचं, खासदारांचं जे स्वागत होत आहे ते झालं असतं का? सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. अजितदादांना त्रास होणं स्वाभाविक आहे कारण ते सरकार तर तेच चालवत होते ना, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. तसंच सरकार चुकीचं काम करत असेल तर सल्ला देण्याचा अधिकार नक्कीच विरोधकांना असल्याचंही शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

विरोधी पक्षांना ‘वंदे मातरम’ची ऍलर्जी

बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

अतिवृष्टीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अतिवृष्टीबाबतही अजिदादांनी प्रश्न उपस्थित केले. मी आणि फडणवीसांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. विरोधी पक्षनेतेही गेले पण ते पूर ओसरल्यावर गेले. आम्ही ग्राऊंडवर काम करणारे लोक आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडू, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

मी माझ्या जागेवरच आहे

धर्मवीर चित्रपटातील स्वर्गीय आनंद दि घे यांनी विचारलेला प्रश्न एकनाथ कुठे आहे ? हा प्रश्न महाराष्ट्राला, मराठी माणसाला पडला आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी माझ्याच जागेवर आहे असे एकाच शब्दात उत्तर दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा