प्रकल्पांबाबत श्वेतपत्रिका काढून दूध का दूध…करणार?

यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे.

प्रकल्पांबाबत श्वेतपत्रिका काढून दूध का दूध…करणार?

महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप मविआकडून केला जातं आहे. पण या प्रकल्पांच्या बाबतीत सत्यपरिस्थिती विद्यमान शिंदे फडणवीस सरकारकडून समोर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांची महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश शिंदे फडणवीस सरकारने दिले आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे.

ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आम्ही अल्ट्रा मेगा प्रकल्प आम्ही आणत आहोत, त्याप्रमाणे सध्या मेगा खोटं बोलण्याचा प्रकार महाराष्ट्रात सुरु असल्याचे उदय सामंत म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्रातील उद्योगांबाबतची शासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आजच्या माझ्या पत्रकार परिषदेत कोणाची बाजू खोडून काढण्याचा प्रयत्न नाही. कारण गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रात उद्योजकांच्या बाबतीत नकारात्मक वातावरण तयार केलं जात आहे, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना जीवे मारण्याची धमकी

रस्ते अपघात मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

पुढे ते म्हणाले, नुकतचं सॅफ्रन प्रकल्पाबाबत महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार घडला. दीड दोन महिन्यांत ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या खोडण्याचं काम तसेच संबंधीत कंपनी गेल्याचं सांगून त्याचं खापर आमच्यावर फोडण्याचं काम काही लोक करत आहेत. त्यामुळे वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन, सिनारमस या प्रकल्पांची खरी वस्तूस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरात श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत. या श्वेतपत्रिकेत महाराष्ट्र शासनानं उद्योगांबाबत केलेला पत्रव्यवहार, बैठका तसेच याचे रेकॉर्डचा पुरावा आम्ही महाराष्ट्राला देणार आहोत, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version