‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’

“राष्ट्रपती राजवट हाच या गुंडांपासून संरक्षण मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे.” असं ट्विट आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंच्या घराबाहेर जाऊन राडे करणाऱ्यांचं समर्थन केलं. ठाकरेंच्या या कृत्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे.

“तर हा खरंच बंगाल हिंसाचाराच्या धर्तीवर केलेला हिंसाचार होता. मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची असते. पण इथे मुख्यमंत्रीच गुंडांचा सत्कार करत आहेत. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. राष्ट्रपती राजवट हाच या गुंडांपासून संरक्षण मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे.” असं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे.

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत राडा घातला. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं. युवासैनिकांनी राडा घातल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी वरुण सरदेसाईंना आणि सोबतच्या युवासैनिकांना पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या या कृत्यानंतर भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली जात आहे.

मुंबईत विविध ठिकाणी राणा आणि दगडफेकप्रकरणी काल तीन गुन्हे दाखल झाले आहेत. सांताक्रुज पोलिस ठाण्यात २ तर कस्तूरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा असे एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

भारतात कोरोना संदर्भात ‘ही’ दिलासादायक बातमी

लीड्सवर भारत ‘लीड’ वाढवणार?

नारायण राणे यांचं काही चुकलं नाही

सीआयए-तालिबान दरम्यान गुप्त भेट

भाजपाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर टीका केली आहे. “हे केवळ पक्षप्रमुख होऊ शकतात, मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही.” असा हल्लाबोल भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.

Exit mobile version