१८ जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक

१८ जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक

गुरुवार,९ जून रोजी निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली. येणाऱ्या १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. तर २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची २१ जून ही अंतिम तारीख आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक तारखेची घोषणा केली. १८ जुलै रोजी मतदान होईल. २१ जुलै रोजी मतमोजणी होऊन देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. तर २४ जुलैला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रपती पदासाठी ४ हजार ८०९ मतदान होणार आहेत.

हे ही वाचा:

मलिक,देशमुखांची मतदानासाठी केलेली याचिका फेटाळली

सलमान खान धमकी प्रकरणी, सौरभ महाकाळची चौकशी

रोजीरोटी देईन, पाणी, रस्ते देईन तेव्हाच संभाजीनगर नाव होईल!

विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी भाजपाकडून सदाभाऊ खोत

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुक मतदानासाठी एक विशिष्ट प्रकारचा पेन पुरवण्यात येणार आहे. मतदान करण्यासाठी एक,दोन,तीन असे लिहून पसंती दर्शवावी लागणार आहे. पहिली पसंती न दर्शवल्यास मत रद्द ठरवले जाईल. कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या सदस्यांसाठी व्हीप जारी करता येणार नाही. संसदेत आणि विधानभवनांमध्ये मतदान होईल. राज्यसभेचे महासचिव निवडणूक प्रभारी असतील. तसेच कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले.

Exit mobile version