राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला भेट देणार आहेत पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर मध्ये सात तारखेला रामनाथ कोविंद हे रायगडावर येथील राज्यसभा खासदार संभाजी राजे भोसले यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे
खासदार संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाला भेट देण्याचे आमंत्रण केले होते. त्या आमंत्रणाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकार केला आहे. ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पवित्र अशा रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार आहेत.
हे ही वाचा:
विरोधकांचा मारा थोपविण्यासाठी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत
१ डिसेंबरपासून महाराष्ट्रात किलबिलाट
परमबीर यांची युनिट ११ कडून कसली सुरू आहे चौकशी?
वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही! नवाब मलिक मुंबई उच्च न्यायालयासमोर नमले
राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी भोसले यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून या संदर्भातील माहिती दिली आहे. “राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सप्टेंबर महिन्यात खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाली होती. यावेळी खासदार छत्रपती संभाजी भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीसाठी आमंत्रित केले होते.