30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरराजकारणमहाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये IIM च्या स्थायी परिसराचे लोकार्पण

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये IIM च्या स्थायी परिसराचे लोकार्पण

Google News Follow

Related

महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखला जाणाऱ्या नागपूरमध्ये आजपासून IIM चा स्थायी परिसर सुरू झाला आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज IIM नागपुरच्या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नागपूरचे खासदार आणि देशाचे रस्ते, महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे उपस्थित होते. त्यांच्यासोबतच महाराष्ट्राचे मंत्री नितीन राऊत, सुभाष देसाई आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

रविवार, ८ मे रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रपतींच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी IIM नागपूरमधून नोकरीचे निर्माते तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. “मला खात्री आहे की या IIM नागपूरच्या इकोसिस्टीम मधून विद्यार्थ्यांची मानसिकता ही नोकरीचे शोधकर्ता होण्यापेक्षा नोकरी पुरवण्याची तयार होईल” असे राष्ट्रपती म्हणाले.

नवोन्मेश आणि उद्योजकता यांना प्रशंसेची पावती देत प्रोत्साहन देणाऱ्या युगात आपण राहत आहोत. नवोन्मेश आणि उद्योजकता या दोन्हीतही, तंत्रज्ञानाद्वारे आपले जीवन अधिक सुकर करण्याची क्षमता तर आहेच त्याचबरोबर अनेकांना रोजगाराच्या संधी पुरवण्याचेही सामर्थ्य आहे. आयआयएम नागपूर इथली परिसंस्था, रोजगार मागणारे ऐवजी रोजगार पुरवणारे होण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी’

बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम

सलमान म्हणतो, ‘आनंद दिघे आणि माझ्यात हे साम्य’

गुणरत्न सदावर्ते यांचे टार्गेट आता ‘एसटी बँक’

आयआयएम नागपूरने, आपल्या उद्योजकता केंद्राद्वारे आयआयएम नागपूर फौंडेशन फॉर इंट्राप्रेनरशिप डेव्हलपमेंट (InFED) उभारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. इनफेडने महिला स्टार्ट अप कार्यक्रमातून महिला उद्योजकांना यशस्वी पदवीधारक होण्यासाठी सक्षम केल्याची बाब निश्चितच अभिमानास्पद असल्याचे सांगून त्यापैकी सहा जणींनी उद्योगाचा प्रारंभ केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. असे कार्यक्रम, महिला सबलीकरणासाठी प्रभावी मंच पुरवतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा