राष्ट्रपतींनी केल्या राज्यपालांच्या फेरनियुक्त्या

राष्ट्रपतींनी केल्या राज्यपालांच्या फेरनियुक्त्या

देशभरात एकीकडे केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची आणि फेरबदलांची चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मंगळवार, ६ जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नव्या नियुक्त्या आणि बदल जाहीर केले आहेत. त्यामुळे देशातील एकूण ८ राज्यांना नवे राज्यपाल मिळणार आहेत.

राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या नियुक्त्यांनुसार मिझोरामचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त भार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पाहात होते. हरियाणाचे राज्यपाल असलेले सत्यदेव नारायण आर्य यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले आहे. तर त्रिपुराचे राज्यपाल असलेले रमेश बायस हे आता झारखंडचे राज्यपाल म्हणून कामकाज पाहणार आहेत.

हे ही वाचा:

‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

साधूंना ठेचून मारले तेव्हा वाचा गेली होती काय?

भास्कर जाधव यांनी विरोधकांना बोलूच दिले नाही

भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा!

थावरचंद गेहलोत हे कर्नाटकचे नवे राज्यपाल असणार आहेत. तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असणारे बंडारू दत्तात्रय यांना हरियाणाचे राज्यपाल म्हणून पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या जागी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून राजेंद्र आर्लेकर ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोरामचे राज्यपाल म्हणून हरिभाऊ कंभामपती यांची नेमणूक केली गेली आहे. तर मंगुभाई पटेल हे मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून कामकाज पाहणार आहेत.

Exit mobile version