ओडिशातील महाराजा श्रीरामचंद्र भांजा देव विद्यापीठात भाषणादरम्यान वीज खंडित झाल्यानंतर सभागृहात अंधार झाला होता. अंधुक प्रकाशात केवळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा एकमेव चेहरा दिसत होता. अंधारातच राष्ट्रपतींनी भाषण केले. मात्र या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘अशाप्रकारे संपूर्ण सभागृहात काळोख असताना मान्यवर व्यक्तींवरच प्रकाशझोत राहणे अत्यंत धोकादायक आहे. प्रेक्षक प्रकाशझोतात आणि मान्यवर अंधारात असणे गरजेचे होते,’ असे मत माजी पोलिस महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांनी या घटनेनंतर परिस्थितीशी जुळवून घेणारी रॉबर्ट फ्रॉस्टची लोकप्रिय कविता ट्वीट केली: “अंधर जेटिकी, आलोका सेटिकी एहे जे गहना बना, चलबी चालीबी ना पडी बी ठकी, बुजीबा आगरु आकाही’. ज्याचा अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. ‘प्रकाश आणि अंधार समान प्रमाणात अस्तित्वात आहे. जंगले खोल आणि गडद आहेत, मी टिकून राहीन आणि झोपी येईपर्यंत चालत राहीन.’ हजारो लोकांसमोर अंधारात त्या म्हणाल्या, ‘प्रकाश आणि अंधार एकाच मार्गाने घ्यावा लागतो,’.
एअर कंडिशनच्या अतिभारामुळे वीज खंडित झाली. दिवे गेले, मात्र ध्वनी प्रणालीवर परिणाम झाला नाही, असा प्राथमिक निष्कर्ष काढला जात आहे. मात्र राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात दिवे कसे जाऊ शकतात, असा प्रश्न माजी पोलिस महासंचालक गोपाल नंदा यांनी उपस्थित केला. ‘या प्रकरणाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या प्रसंगी काही विपरित घटना घडली नाही, म्हणून देवाचे आभार. मात्र सुरक्षा व्यवस्थेचाही पुनर्विचार केला पाहिजे,’ असे नंदा म्हणाले.
हे ही वाचा:
खलिस्तान कमांडो फोर्सच्या प्रमुखाची लाहोरमध्ये गोळ्या घालून हत्या !
‘अजित पवारांचं वागण बघूनचं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’
६० कोटींच्या अनुदानाचा निर्णय ‘बेस्ट’ नाही !
‘द केरळ स्टोरी’ चित्रपट मध्यप्रदेशात टॅक्स फ्री; आता महाराष्ट्रातही मागणी !
‘अशा परिस्थितीत राष्ट्रपतींना बाजूला नेले पाहिजे होते. ‘एकतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने त्यांचे बोलणे थांबवण्याचा सल्ला द्यायला हवा होता किंवा वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत त्यांना सुरक्षित जागी ठेवता आले असते,’ असे मत मिश्रा यांनी व्यक्त केले. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मयूरभंजचे जिल्हाधिकारी विनीत भारद्वाज यांनी दिली. त्यांनी चौकशीसाठी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना तसेच, वीज वितरक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही बोलावले होते. त्यांची चौकशी सुरू आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू संतोष त्रिपाठी यांनी या लाजिरवाण्या परिस्थितीची जबाबदारी घेऊन माफी मागितली आहे. विद्यापीठाने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पदव्युत्तर परिषदेचे अध्यक्ष पी. के. सतपथी, रजिस्ट्रार सहदेव समधिया आणि विकास अधिकारी बसंत कुमार मोहंता यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय समिती तयार केली आहे. विद्यापीठाने इलेक्ट्रिशियन जयंत त्रिपाठी यालाही निलंबित केले आहे.