छान वाटले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आभाळात सुखोई ३०च्या सहाय्याने भरारी घेतल्यानंतर व्यक्त केली. शनिवारी हा एक अनोखा अनुभव राष्ट्रपतींनी घेतला. तिन्ही दलाच्या प्रमुख या नात्याने भारतीय शस्त्रसामुग्रीची, शस्त्रसज्जतेची माहिती करून घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. त्यानुसार मुर्मू यांनी हा अनुभव घेतला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जेट फायटर विमानाने शनिवारी सकाळी भरारी घेतली आणि त्यांचे नाव इतिहासात अशी कामगिरी करणाऱ्या चार राष्ट्रपतींमध्ये समाविष्ट झाले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील व रामनाथ कोविंद यांनी यापूर्वी फायटर जेट विमानाने आकाशाला गवसणी घातली होती. राष्ट्रपतींनी शनिवारी आसाममधील तेजपूर येथून हे उड्डाण केले.
तेजपूरमधून सुखोई ३० MKI या विमानाने त्यांनी आकाशात झेप घेतली. राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख असतात त्यामुळे भारतीय शस्त्रसामुग्रीची सज्जता माहीत करून घेण्याची संधी त्यांना असते. त्यानुसार त्यांनी सुखोईतून हा वेगळा अनुभव घेतला.
हे ही वाचा:
बोनी कपूरची चांदीची भांडी जप्त, किंमत ३९ लाख
मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याच्या फोन नंतर खळबळ, पोलीस सतर्क
आयपीएल मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून अनिल जयसिंघानीला अटक
मुद्रा योजनेंतर्गत ४०.८२ कोटी लोकांना मिळाली २३. २ लाख कोटींची कर्जे
गुवाहाटीहून आसामला आल्यानंतर मुख्यमंत्री हिमांता बिस्वसर्मा यांनी त्यांचे स्वागत केले आणि नंतर वायूसेनेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. मग त्या फ्लाइंट सूट परिधान करून विमानात बसल्या. ग्रुप कॅप्टन नवीन कुमार तिवारी यांनी हे विमान उडविले. त्यांच्या मागील बाजूस राष्ट्रपती बसल्या होत्या. यासंदर्भात बिस्वसर्मा यांनी ट्विट केले की, राष्ट्रपतींनी केलेल्या या उड्डाणाला वेगळे महत्त्व आहे. कारण हा भाग भारत चीन सीमेच्या जवळ आहे. त्यामुळे शेजारी देशांना योग्य संकेत पोहोचवला जातो.
सुखोई ३० ची वैशिष्ट्ये
सुखोई ३० हे विमान ५७ हजार फुटांपर्यंत उंच उडू शकते. एका मिनिटांत ५९ हजार फुटापर्यंत ते झेपावू शकते. या विमानात ३० एमएमची गन लावण्यात आली आहे. त्यातून एका मिनिटात १५० गोळ्या बाहेर पडतात. शत्रूंची विमाने, ड्रोन यातून निसटू शकत नाहीत. या विमानात असे १२ पॉइंट आहेत जिथे शस्त्र बसविण्यात येतात. त्यात चार प्रकारचे मिसाइल आणि १० प्रकारचे बॉम्ब लावता येऊ शकतात. ४ प्रकारचे रॉकेट्सही या विमानाला बसवता येऊ शकतात.