निवडणूक आयोगाचे ठाकरेंना आदेश
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना दोन आठवड्यांमध्ये कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली होती, पण ही मुदत निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे.
एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी उठाव केल्यानंतर भाजपासोबत सत्ता स्थापन केली त्यानंतर महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात तर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या शिवसेनेवरच्या दाव्याचा वाद निवडणूक आयोगाकडे आहे. या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांची मुदत मागण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाकडून ही विनंती मान्य करण्यात आली नसून उद्धव ठाकरेंना उत्तरासाठी अवघ्या पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंना केंद्रीय निवडणूक आयोगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता २३ ऑगस्टपर्यंत कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर धनुष्यबाण कोणाचा यावर निर्णय होणार आहे.
हे ही वाचा:
उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला
परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या
जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
बेपत्ता मुलांना शोधून पालकांच्या चेहऱ्यावर आणणार ‘मुस्कान’
लोकसभा, विधानसभा आणि पक्ष रचनेत बहुमत असल्याचं दावा एकनाथ शिंदेंनी केला असून तशी आकडेवारी देखील निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली आहे. १९ जुलै रोजी निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहले होते. त्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळावं अशी मागणी करण्यात आली होती.