द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार

भारताच्या नव्या राष्ट्रपतींच्या नावावर आज, २१ जुलैला शिक्कामोर्तब होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान झाले होते. अद्याप निकाल जाहीर झालेला नाही, परंतु द्रौपदी मुर्मू यांचे मूळ गाव असलेल्या रायरंगपूरमध्ये त्यांच्या विजयाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

द्रौपदी मुर्मू यांचे मूळ गाव ओडिशातील रायरंगपूर येथे आहे. तिथे त्यांच्या विजयाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी मिठाई बनवली जात आहे आणि त्यांच्या गावासह आसपासच्या अनेक गावातील लोकांनी विजयी मिरवणूक आणि आदिवासी नृत्यांचे नियोजन केले आहे. भाजपासुद्धा मुर्मू यांच्या विजयाची योजना आखत आहे. भाजपा नेते तपन महंत म्हणाले की, आम्ही वीस हजार लाडू तयार करत आहोत आणि मुर्मू यांच्या अभिनंदनासाठी १०० बॅनर लावणार आहोत.

दुसरीकडे भाजपाने गुरुवारी मतमोजणीनंतर मेगा ‘अभिनंदन यात्रे’चे नियोजन केले आहे. द्रौपदी मुर्मू निवडून आल्यास त्यांच्या ऐतिहासिक विजयासाठी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा मोर्चाचे नेतृत्व करतील. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांचा विजय जवळजवळ निश्चित झाला आहे. त्यांचा विजय साजरा करण्यासाठी पंत मार्गावरील दिल्ली भाजपा कार्यालयातून रोड शो सुरू होणार आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय आयोगाला पत्र

“भारताच्या कोविड विरुद्धच्या लढ्याचा भावी पिढ्यांना अभिमान वाटेल”

द्रौपदी मुर्मू ह्या झारखंडच्या माजी राज्यपाल आणि ओडिशाच्या माजी मंत्री देखील आहेत. त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील. आज सकाळी ११ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. सत्ताधारी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा रिंगणात आहेत.

Exit mobile version