भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र युनिटने २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ आणि त्यामध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी भाजपाच्या १२ ज्येष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे.
भाजपाचे हे १२ ज्येष्ठ नेते १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन जनतेशी जनसंपर्क करणार आहेत. तसेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रत्येक प्रभागात निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहे.
३० मार्च रोजी मुंबईत भाजपा महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा:
‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’
‘अन्य सदस्यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या अनुभवाचा लाभ घ्यावा’
व्हीआयपींच्या सेवेत गुंतलेल्या वन अधिकाऱ्यांना कर्तव्याचा विसर!
मेघालयचे म्हणताहेत असा मी ‘आसामी’
भाजपा नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी ३० मार्च रोजी पत्रकारांना सांगितले की, बैठकीत भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांना भेटी देतील असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भाजपा नेते केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत. यासोबतच प्रभाग स्तरावरही भाजपा पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीवरही बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक प्रभागात जाऊन भाजपाचे कार्यकर्ते मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरू करणार आहेत.