30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणप्रवीण गायकवाडना लायकीत राहण्याचा इशारा! या पक्षाने दिला दम

प्रवीण गायकवाडना लायकीत राहण्याचा इशारा! या पक्षाने दिला दम

Google News Follow

Related

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना पुण्यात फिरणे मुश्किल करू असा दम देण्यात आला.

राज ठाकरेंवर गायकवाड यांनी टीका केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना चांगलेच सुनावले आहे. मनसेने प्रवीण गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी बिनबुडाची टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केली होती. गायकवाड यांच्या टीकेला मनसेने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू”, असा दम मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी गायकवाड यांना भरला आहे.

वसंत मोरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. “तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू”, असा इशारा देतानाच “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून तुम्ही इच्छुक होता. तेव्हा तुम्हाला मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना पाहिलंय. एवढेच काय मी प्रविण गायकवाड, असं स्वत:चं नाव लोकांना सांगत होतात”, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखला भागौडा घोषित करा

कोंबड्याचे ‘कुकू च कू’, नी कश्मीरातील पहाट

मेघालयात ‘या’ कारणासाठी गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा

जुहू समुद्रात या जलचराचे आक्रमण

“राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे”, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

“हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा राज ठाकरे यांना विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की”, असेही प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या २० वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा