विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवार, १ मार्च रोजी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक प्रकरणात अतिरेक्यांना पैसे पुरवण्याचे काम कोणी केले हे समोर आले आहे. हे टेरर फंडिंग कनेक्शन आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केले आहे. मलिकांना भाजपाने नव्हे, तर न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे भाजपाने ‘नवाब मलिक हटाव, देश बचाव’ अभियान सुरू केले आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
राज्यात एकीकडे डॉक्टर आंदोलन करतायत. एसटी आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. मात्र, दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी वेळ आहे, असे टीकास्त्र प्रवीण दरेकर यांनी सरकारवर सोडले आहे. सुडाने कारवाई केल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकार करत आहे. मात्र, या अभियानातून त्यांचे आरोप आम्ही खोडून काढू, असा दावाही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, अनिल देशमुखांवर आरोप झाले. तेव्हाही भाजपचा संबंध जोडला. मात्र, यात भाजपचा कोणताही संबंध नाही. नवाब मलिकांना देशभक्त दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र,सलिम पटेल आणि शाहवली खान यांच्यामार्फत जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार झाली. यात नवाब मलिक यांचा संबंध उघड झाला आहे. त्यामुळे ही कारवाई झाली, असा दावाही प्रवीण दरेकर यांनी केला.
हे ही वाचा:
‘भारतीयांना मायदेशात परत आणण्याची मोहीम काय शिवसेनेने सुरू केली का?’
शार्क टँक इंडिया फेम ‘भारत पे’चे सह- संस्थापक अश्नीर ग्रोव्हर पायऊतार
युक्रेनला भारताकडून मदतीचा हात
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार पलटला
प्रवीण दरेकर म्हणाले की, मलिकांना विनासमन्स अटक करता येत नसल्याचा युक्तिवाद केला गेला. मात्र, त्यावर न्स्पयायालयाने स्ष्टपपणे सांगितले की, ही PMLA (19) कायद्यानुसार कारवाई केली आहे. ते मनी लॉड्रिंग प्रकरणात अडकले आहेत. त्यांना भाजपाने नव्हे, तर न्यायालयाने कस्टडी दिली आहे. आता तर गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणून नवाब मलिक आरोपी नव्हेत, असा जावई शोध महाविकास आघाडी करतेय. या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.