‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’

‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून विलनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचे जोपर्यंत राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशाराही एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावरूनच विरोधी पक्षातील नेत्यांनी आता सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

प्रवीण दरेकरांनी ट्विट करत म्हटले आहे की ‘एसटीवर फक्त शिवशाही लिहून किंवा भगवा रंग देऊन शिवशाही अवतरणार नाही,’ असा टोला दरेकरांनी सरकारला लगावला आहे. ‘शिवशाहीत रयतेचे रक्षण करणे अपेक्षित आहे. एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला आहे,’ अशी खोचक टीका देखील त्यांनी केली आहे.

प्रवीण दरेकरांनी ट्विटमधून राज्य सरकारला लवकरात लवकर एसटीचे विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावे, असा इशाराही दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांप्रती संवेदना सरकारमध्ये कधी जागी होणार आहे? असा सवाल विचारत त्यांनी पुढे एसटीचे विलीनीकरण तात्काळ करा, अन्यथा… अशा शब्दात खडसावले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री बदलूनही सिद्धू विरुद्ध पंजाबचे मुख्यमंत्री मालिका सुरूच

‘अहमदनगरची दुर्घटना हे सरकारच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड’

हिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी

कंगना, सिंधूसह १०२ मान्यवरांना पद्म पुरस्कार

मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. काही मागण्या सरकारने मान्य केल्या असून त्यांची विलनीकरणाची मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याने त्यांनी हा संप सुरूच ठेवला आहे. अनेक विरोधी पक्षनेत्यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. भाजपचे आमदार गोपींचद पडळकर हे देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरीता मैदानात उतरले आहेत.

Exit mobile version