पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात झालेली वृक्षतोड म्हणजे कुंपणच शेत खातंय

पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात झालेली वृक्षतोड म्हणजे कुंपणच शेत खातंय

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात झालेल्या वृक्षतोडीची पाहणी करायला भारतीय जनता पार्टीचे नेते जाऊन पोहोचले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा तसेच जिल्हा मंत्री दीपक सावंत यांनी या वृक्षतोडीची जाऊन पाहणी केली आहे. या पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना ‘पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात झालेली वृक्षांची कत्तल म्हणजे कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार आहे’ असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

शनिवार, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. आपले पर्यावरण प्रेम दाखवायला कायम उत्सुक असणारे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विविध वृत्तपत्रात पानभर जाहिराती देत या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण पर्यावरण दिनाच्या आदल्याच दिवशी आदित्य ठाकरे हे ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या वरळी मतदारसंघातील भागात अंदाजे २५ झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रविवार, ६ जून रोजी भाजपाच्या नेत्यांनी या वृक्षतोडीची पाहणी केलेली.

हे ही वाचा:

मराठा आरक्षण हा राज्याचाच विषय: उदयनराजे भोसले

चित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम

वेळ मारून नेणाऱ्यांचे तोंडावर आपटणे नेहमीचेच

पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल

यावेळी माध्यमांशी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. नागरिक ज्यावेळी महापालिकेकडे झाडाच्या फांद्या वाढल्याची तक्रार करतात आणि त्या कापल्या जाव्यात अशी मागणी करतात. तेव्हा दोन दोन महीने त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्या फांद्या पडून घरांचे नुकसान होते माणसं मरतात. तरी महापालिकेला जाग येत नाही. पण आता मात्र रातोरात या वृक्षांची कत्तल होत आहे. कुंपणच शेत खात असल्याचा हा सारा प्रकार आहे असे दरेकर म्हणाले. या साऱ्या प्रकरणात महापालिकेचे, वृक्ष प्राधिकरणाचे जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

Exit mobile version