ग्लोबल टेंडरच्या बाबतीत ठाकरे सरकार फक्त दिवस ढकलतंय

ग्लोबल टेंडरच्या बाबतीत ठाकरे सरकार फक्त दिवस ढकलतंय

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ग्लोबल टेंडरच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ग्लोबल टेंडर संदर्भात ठाकरे सरकार फक्त दिवस पुढे ढकलण्याचे काम आकारात आहे अशी टीका दरेकरांनी केली आहे. ट्विटरवर एकव्हिडीओ संदेश पोस्ट करत प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

देशात सुरु असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. त्यात महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनता रोज भरडली जात आहे. देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन आता काही महिने झाले तरीही महाराष्ट्र सरकार लसीकरणाच्या बाबतीत गोंधळलेले दिसत आहे. लसीकरणासाठी ग्लोबल टेंडरच्या गप्पा मारणारे ठाकरे सरकार या बाबतीत फक्त दिवस पुद्धे ढकलण्याचे काम करत आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एका व्हिडिओ संदेशातून सरकारला धारेवर धरले आहे.

हे ही वाचा:

ग्लोबल टेंडर बाबतही ठाकरे सरकार काखा वर करण्याच्या तयारीत

झीशान सिद्दिकींकडून शिवसेनेला इदी

सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?

अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं

केंद्राने राज्यांना पन्नास टक्के लस खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे तरी राज्य सरकार सांगत आहे केंद्राची परवानगी नाही. जे राज्य राज्य सरकार सांगतंय की आम्हाला केंद्राची मान्यता हवी आहे, केंद्राने परवानगी दिली नाही. पण असे असताना महाराष्ट्र सरकारने मात्र मुंबई महापालिकेला ग्लोबल टेंडरची परवानगी दिली आहे. म्हणजे जे स्वतः सांगतात आम्हाला परवानगी नाही ते दुसऱ्यांना परवानगी देत आहेत. यात आणखीन समन्वयाचा अभाव म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की महापालिकेला अशा प्रकारे परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ग्लोबल टेंडरच्या संदर्भातील कोणतीही वस्तुस्थिती लोकांसमोर न आणता दिवस पुढे ढकलण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून होत आहे असा आरोप दरेकरांनी केला आहे.

Exit mobile version