23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसावरकरप्रेमींचा विजय; सावरकर स्मारक अध्यक्षपदी प्रवीण दीक्षित यांची बहुमताने निवड

सावरकरप्रेमींचा विजय; सावरकर स्मारक अध्यक्षपदी प्रवीण दीक्षित यांची बहुमताने निवड

Google News Follow

Related

काँग्रेसच्या दीपक टिळक यांचा सपशेल पराभव

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर स्मारकाच्या बहुचर्चित अध्यक्षपद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी विजय मिळविला. काँग्रेसचे नेते दीपक टिळक यांना १३७ विरुद्ध २ मतांनी पराभूत करत दीक्षित हे अध्यक्षपदी एकतर्फी जिंकून आले. विशेष म्हणजे स्वतः दीपक टिळक या निवडणुकीसाठी मतदान करायला आलेच नाहीत. सावरकरप्रेमींचा या निवडणुकीत विजय झाला.

सावरकर स्मारकाच्या या अध्यक्षपदाची निवडणूक गेले काही दिवस चर्चेत होती. लोकमान्य टिळकांचे पणतु तसेच काँग्रेसचे नेते दीपक टिळक यांनी दुसऱ्यांदा या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. टिळक यांच्याकडून स्मारकाच्या कारभाराविषयी आरोप करण्यात आले होते, पण स्मारकाकडून त्यांचे खंडनही केले गेले. महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी अर्ज दाखल केला तेव्हा स्मारकाच्या सदस्यांकडून त्यांना पूर्ण समर्थन असल्याचे वातावरण होते. एकप्रकारे सावरकरविरोधी काँग्रेस आणि सावरकर प्रेमी यांच्यातील हा संघर्ष होता. त्यात अखेर सावरकरप्रेमींनी बाजी मारली. एकूण १३९ लोकांनी या निवडणुकीत मतदान केले त्यात १३७ मते ही दीक्षित यांना पडली तर २ मते टिळक यांना मिळाली. महत्त्वाचे म्हणजे स्वतः टिळक या मतदानाला आलेच नाहीत. दुसऱ्यांदा ते स्वतःला मत द्यायलाही आले नाहीत. यापूर्वीही त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती.

सावरकर स्मारकाचे सावरकर विचारप्रसाराचे कार्य आणखी वाढविण्याचे ध्येय दीक्षित यांनी बाळगले आहे. नव्या पिढीमध्ये सावरकर विचार रुजविण्याचे कार्य अधिक व्यापक करण्याचाही मनोदय त्यांनी बोलून दाखविला आहे.

हे ही वाचा:

सास भी…मधील बहु बनली सासु!

‘खुर्चीत असतो तर एसटी आंदोलन इतके दिवस चालले नसते’

राज्यपाल घेणार विधानसभा अध्यक्षपदाबाबत निर्णय

‘मन की बात’मधून पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटचा गौरव

 

दीक्षित हे आयपीएसच्या १९७७च्या बॅचचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिस, एसआरपी अशा महत्त्वाच्या विभागांत महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. शिस्तप्रिय, गंभीर स्वभाव व मृदू भाषी म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रपती पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा