महाराष्ट्रातील सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देताना भाजपचे आमदार प्रवीण दरेकर हे पुन्हा एकदा मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. दरेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबै बँकेचे अध्यक्ष होते. परंतु, सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीने मुंबै बँक आपल्या ताब्यात घेऊन दरेकर यांना पायउतार केले होते. पण राज्यात सत्तांतर झाले अणि बँकेच्या अध्यक्षपदाचे पुन्हा एकदा नव्याने समीकरण जुळून आल्याचे बघायला मिळत आहे.
मुंबै बँक घोटाळ्याच्या बाबतीत त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे नेता धनंजय शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकार फेडरेशनच्या निवडणुकीत दरेकर यांनी स्वत:ला मजूर म्हणून सांगितले व आपण स्वत: प्रतिज्ञा मजदूर संस्थेशी जोडलेलो असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज भरला होता. नंतर दरेकर हे मजूर म्हणून अपात्र ठरले होते. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: निवडणुकीची जबाबदारी घेत प्रवीण दरेकरांना धक्का दिला होता.
हे ही वाचा:
राहुल गांधी, प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच
थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू
पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी
उपाध्यपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे
मुंबै बँकेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे मिळून १० संचालक आहेत. राज्यात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आल्यामुळे दरेकर यांनी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदी दरेकर आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे यांनी निवड झाली आहे. मुंबै बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला होता.