भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण दरेकरांचा आज मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दरेकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. राज्य सरकाराच्या दबावाखाली हे षडयंत्र रचलं जात असल्याचे दरेकर म्हणाले आहेत.
दरेकर म्हणाले, ठाकरे सरकारचा हा आमच्याविरोधात डाव आहे, म्हणून आमच्यावर संजय राऊत गुन्हे दाखल करत आहेत. संजय राऊत यांचे घोटाळे उघडू लागल्याने संजय राऊत आमच्याविरोधात डाव आखत आहेत. आज न्यायालयात माझा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. महाविकास आघाडीकडून माझ्यावरही कारवाईचा ससेमिरा लावला, परंतु हा दबाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मविआ राज्यात दहशद माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे दरेकर म्हणाले आहेत.
तसेच किरीट सोमय्या हे आता उच्च न्यायालयात जाणार आहेत. याबद्दलसुद्धा दरेकरांनी किरीट सोमय्या यांचे तोंड भरुन कौतुक केले. ते म्हणाले, सोमय्या हे धाडसी नेते आहेत. सत्ताधाऱ्यांचे अनेक घोटाळे त्यांनी समोर आणले आहेत. मात्र ते सरकार विरुद्ध बोलल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीकडून माझ्यावरही कारवाईचा ससेमिरा लावला, परंतु हा दबाव न्यायालयाने फेटाळून लावला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
तोंडी आरोपांची राळ उडवणाऱ्या राऊत यांच्याकडून नवे आरोप
नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला इजिप्तमध्ये पकडले
प्रवीण दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर
गाझियाबादमध्ये अग्नितांडव, ४० गायी जिवंत खाक
किरीट सोमय्या हे पळून जाणारे नेते नाहीत तर इतरांना पळवणारे नेते आहेत. कायदेशीर कारवाईच्या कामात ते व्यस्त असल्याने ते चौकशीला सोमोरे जात नसतील. मात्र आवश्यकता वाटली तर स्वतःहून ते पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातील, असही दरेकर म्हणाले आहेत.