प्रवीण दरेकरांना न्यायालयाकडून दिलासा; अटकेपासून संरक्षण

प्रवीण दरेकरांना न्यायालयाकडून दिलासा; अटकेपासून संरक्षण

मुंबई सत्र न्यायालयाने भाजपा नेते प्रविण दरेकर यांना पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. यापूर्वीही प्रवीण दरेकर यांना गेल्या सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रवीण दरेकर यांना पुन्हा दिलासा मिळाला असून २५ मार्च रोजी निकाल सुनावला जाणार आहे. तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.

मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने या तक्रारीची दखल घेत चौकशीनंतर प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचे सांगत त्यांना अपात्र ठरवले होते.

प्रवीण दरेकरांच्या वतीने जेष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला असून तपास अगदीच प्राथमिक अवस्थेत असताना अटकेची गरजच काय? प्रवीण दरेकरांप्रमाणे सध्याच्या घडीला एकूण ३५ नेते मजूर वर्गातून आहेत मग केवळ प्रवीण दरेकांच्याच मजूर वर्गातून येण्यावर आक्षेप का? असा युक्तिवाद दरेकर यांच्या बाजूने करण्यात आला. २५ मार्च रोजी निकाल सुनावला जाणार आहे मात्र तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

हैदराबादमध्ये गोदामाला लागलेल्या आगीत ११ जण होरपळले

…आणि भारताने गाठले चार अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य

देवभूमीत आजपासून पुष्करराज

सहकार विभागाने प्रविण दरेकर यांना अपात्र ठरवताना अनेक बाबींकडे लक्ष वेधले होते. मजूर म्हणजे अंगमेहनतीचे आणि शारिरीक श्रमाचे काम करणारी व्यक्ती, तसेच त्याचे उपजिविकेचे मुख्य साधन हे मजुरीच असेल. मात्र, प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले होते.

Exit mobile version