प्रवीण दरेकरांना अटक होऊन जामीन मंजूर

प्रवीण दरेकरांना अटक होऊन जामीन मंजूर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना बोगस मजूर प्रकरणात अटक झाली असून तत्काळ जामीनही मिळाला आहे. प्रवीण दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रवीण दरेकर यांना यांना अटक झाल्यास तात्काळ जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

प्रवीण दरेकर हे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात पोहचले होते. त्यावेळी पोलीस ठाण्यात कायदेशीररित्या अटक दाखवून दरेकर यांची तत्काळ जामीन मंजूर करण्यात आला आहे. ३५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.

हे ही वाचा:

‘सत्तेसाठी ठाकरे सरकारने हिंदुत्व गहाण ठेवले’

कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार

एनआयएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी अतुलचंद्र कुलकर्णींची नियुक्ती

कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार

त्यापूर्वी प्रवीण दरेकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. “सरकारने राजकारण करत मला अडकवले आहे. पोलिस ठाण्यात जास्तीत जास्त जाण्याची ड्युटी सरकारने आमच्यामागे लावली आहे. मला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. फक्त कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिस ठाण्याला जात आहे,” असे प्रवीण दरेकर म्हणाले.

Exit mobile version