‘महाराष्ट्र पोलीसांवर राज्य सरकारचा दबाव आहे’

‘महाराष्ट्र पोलीसांवर राज्य सरकारचा दबाव आहे’

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक प्रकरणात पोलिसांनी नोटीस दिली होती. त्यानंतर प्रवीण दरेकर हे आज माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. त्यापूर्वी प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करणार असल्याचेही प्रवीण दरेकर म्हणाले.

एफआयर दाखल करण्याची पोलिसांना खूप घाई झाली होती. त्यांच्यावर राज्य सरकारचा दबाव होता. मुख्यमंत्र्यांचा देखील कारावाईचा अट्टाहास होता. या राज्य सरकारच्या दबावाखाली एफआयआर दाखल झाला असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. त्यांना पूर्ण माहिती देणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर हे माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. पोलीस ठाण्याच्या परिसरात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

हे ही वाचा:

काश्मीर फाईल्स विरोधात पुन्हा शरद पवारांची मळमळ

शिवसेना नेत्याच्या तक्रारीमुळे, राष्ट्रवादीचा आमदार ईडीच्या रडारवर

शरद पवारांना झोंबले राज ठाकरेंचे भाषण

गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारत ऑस्ट्रलियन महिलांनी सातव्यांदा उचलला विश्वचषक

दरम्यान, मुंबई बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकर यांची मजूर म्हणून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणी, मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली होती.

Exit mobile version