राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच अजित पवारांसोबत इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी शुक्रवारी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा दिल्याचे सांगितले त्यानंतर अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची राजभवनात शपथ घेतली.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत कोण असणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, या राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत नव्या विरोधी पक्ष नेत्याच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्य प्रतोद म्हणूनही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
माझा व्हीप राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना लागू
जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत नेमल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्याकडेच आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, आणि जयंत पाटलांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेते पदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी जो व्हिप काढेल तो त्यांना लागू होईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
‘अमरनाथ’ यात्रेदरम्यान स्फोटाचा मोठा कट पोलिसांनी उधळवून लावला
अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे
समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?
२५- २५ वर्षे मंत्रिपदे यांनी भोगली. ज्या नेत्याने मेहनत घेऊन ही पदे तुम्हाला दिली त्या माणसाला अशा परिस्थितीमध्ये आणणं हे माणुसकीला पटणार नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. मी मेलो तरी शरद पवार यांना सोडणार नाही, असेही आव्हाड म्हणाले.