‘दहशतवाद्याच्या नावाने रुग्णवाहिका चालू करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा?’

‘दहशतवाद्याच्या नावाने रुग्णवाहिका चालू करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथील एका कार्यक्रमात बोलताना आपला ओबीसींवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. यावरून भाजप मुंबई सचिव आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा सदस्य प्रतिक कर्पे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रतिक कर्पे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात, ओबीसी वर माझा विश्वास नाही दहशतवादी इशरत जहांच्या नावाने रुग्णवाहिका चालू करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा, असा खोचक सवाल प्रतिक कर्पे यांनी विचारला आहे. ओबीसी आरक्षण कायमचे गोठविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे. मुख्यमंत्र्यानी हेच धोरण ठेवले तर ओबसी समाजाचे आरक्षण कसे टिकणार? असा सवाल प्रतिक कर्पे यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे, सत्तेतील घटक पक्षांतील समन्वयाच्या अभावामुळे मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही पुन्हा एकदा बसनात बांधण्याचे काम ठाकरे यांनी करून दाखविले असून आता तर ठाकरे सरकारमधील मंत्रीच ओबीसी आरक्षणासंदर्भात नकारात्मक बोलताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

तालिबानचे दारू’बॅन’; कालव्यात ओतले हजारो लीटर मद्य

मविआ सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकात इस्लामी शिकवण

मंदिराच्या दारात लटकवले गोमांस

शेवडे, पोंक्षे आणि मांजरेकर एकत्र…नेमकं काय शिजतंय?

जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या मुंब्रा येथे शहीद इशरत जहां या लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याच्या नावाने ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला विरोध केला होता. माहितीनुसार ही सेवा २०१६ मध्ये बंद करण्यात आली.

Exit mobile version