नुपूर शर्मा प्रकरणातून हल्ल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस

अहमदनगरमधील कर्जत शहरात प्रतीक पवार या तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. प्रतीकवर नुपूर शर्मा प्रकरणातून हल्ला झाला असल्याचा आरोप भाजपा नेते नितेश राणे यांनी केला आहे.

नुपूर शर्मा प्रकरणातून हल्ल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस

प्रतीक पवारवर प्राणघातक हल्ल्याचा नितेश राणेंचा आरोप

अहमदनगरमधील कर्जत शहरात प्रतीक पवार या तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतीकला अहमदनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या प्रतीक पवार हा मृत्यूशी झुंज देत आहे. यादरम्यान, प्रतीकवर नुपूर शर्मा प्रकरणातून हल्ला झाला असल्याचा आरोप भाजपा नेते नितेश राणे यांनी केला आहे.

प्रतीक राजेंद्र पवार या तरुणावर गुरुवार, ४ ऑगस्टला रात्री एका गटाने हल्ला केला होता. जुन्या भांडणावरून १० ते १५ जणांनी प्रतीकवर हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र, नितेश राणे यांची आज पत्रकार परिषद झाली. प्रतीक याच्यावर झालेल्या हल्ला हा नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचे नितेश राणे म्हणाले आहेत. ते म्हणाले, गुरुवारी प्रतिकवर १० ते १५ गटाच्या टोळीने हल्ला केला. तलवारीने हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला होता. हल्ला करत असताना हल्लेखोरांना वाटले प्रतीकचा मृत्यू झाला आणि त्यांनी तिथून पळ काढला. मात्र, प्रतीक जिवंत होता त्याच्या मित्रांनी त्याला त्वरित रुग्णलयात दाखल केले. सध्या प्रतीक मृत्यूशी झुंज देत आहे. जुन्या भांडणावरून त्याच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. पण नुपूर शर्मा प्रकरणातून त्याच्यावर हल्ला झाला आहे. काही दिवसांपूर्वी प्रतीकने नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

भुजबळ, आव्हाड यांना अजूनही बंगले सोडवेनात

राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तिहेरी सुवर्णपदक

वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली

बोला, बजरंगाची कमाल!

भाजपा नेते गोपीचंद पडळकर प्रतीकांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार आहेत. तसेच नितेश राणेही त्याच्या कुटुंबाच्या भेटीला जाणार असून, प्रतीकच्या पाठीशी आम्ही आहोत असे, नितेश राणे यांनी यावेळी सांगितले आहे. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी हा हल्ला झाला असल्याचा दावा हिंदुत्वावादी संघटनांनी केला आहे.  प्रतीकवर झालेल्या हल्ल्यामुळे कर्जतमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

Exit mobile version