उद्धव ठाकरे गटाला पडणार पुन्हा खिंडार, कोण कोण जातंय?

प्रतापराव जाधव यांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे गटाला पडणार पुन्हा खिंडार, कोण कोण जातंय?

रोज ठाकरे गटाला कोणत्यातरी मतदारसंघातून खिंडार पडत असते. आता बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातील तीन खासदार आणि आठ आमदार शिंदे गटात येणार असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे.

प्रतापराव जाधव यांच्या गौप्यस्फोटानंतर हे आमदार, खासदार नेमके कोण याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. याअगोदर सुद्धा प्रतापराव जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येणार असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर गजानन कीर्तिकर हे शिंदे गटामध्ये सामील झाले होते. आता पुन्हा प्रतापराव यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटानंतर ठाकरे गटातही चाचपणी होऊ शकते, अशी माहिती आहे. निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे संपूर्ण घर खाली होणार असंही जाधव म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 

इंडोनेशिया भूकंपाने हादरले, शेकडो घरांची पडझड , १६२ ठार

फिजियोथेरेपीस्ट नव्हे हा तर रेपिस्ट

‘युवाशक्तीचा राष्ट्र उभारणीत वापर व्हावा’

पाच लाखांचे बक्षीस असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली विमानतळावर अटक

राज्यात एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड केल्यानंतर मविआ कोसळली आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. पुढे ठाकरे गटातील बारा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटातील पदाधिरकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात येणं सुरूच होतं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी देखील नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला एकामागून एक धक्के सहन करावे लागत आहेत. आता कोणते तीन खासदार आणि आठ आमदार शिंदे गटात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version