प्रशांत किशोर सुरु करणार राजकीय इनिंग

प्रशांत किशोर सुरु करणार राजकीय इनिंग

प्रसिद्ध निवडणूक रणनिती कार प्रशांत किशोर हे आता नव्या भूमिकेत लवकरच दिसणार आहे प्रशांत किशोर अधिकृतपणे राजकारणात प्रवेश करणार आहेत सोमवार, २ मे रोजी ट्विटरच्या माध्यमातून प्रशांत किशोर यांनी यासंबंधीचे सूतोवाच केले आहे.

“लोकशाहीत अर्थपूर्ण सहभागी होण्याचा आणि लोकाभिमुख धोरण तयार करण्यात मदत करण्याच्या माझ्या प्रयत्नात १० वर्षांची रोलरकोस्टर राइड झाली! आता मी पान उलटत आहे. वास्तविक मास्टर्स, लोकांकडे जाण्याची वेळ आली आहे. समस्या आणि “जन सुराज” चा मार्ग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी!” असे ट्विट किशोर यांनी केले आहे.

बिहार राज्यातून प्रशांत किशोर हे या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. बिहार हे प्रशांत किशोर यांचे होमटाऊन असून तिथूनच या राजकीय इनिंगला सुरुवात करण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. त्यामुळे येणाऱ्या विविध विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांचा नवा पक्ष सहभागी होताना दिसणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

बर्लिनमध्ये लहान मुलीच्या चित्राचे केले पंतप्रधान मोदींनी कौतुक

‘शिवसेना नेत्यांना बुद्धिदोष झाला आहे’ आशीष शेलारांची टीका

‘उद्धव ठाकरे भगवे उतरवून हिरवे झालेत’

योगी सरकारने धार्मिक स्थळांवरून बेकायदा ५३ हजार ९४२ भोंगे उतरवले

प्रशांत किशोर यांनी आत्तापर्यंत देशात अनेक निवडणुकांमध्ये रणनीतीकार म्हणून भूमिका बजावली आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तारूढ झाले तेव्हा लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी मोदींसाठी काम केले होते. त्यानंतर जनता दल युनायटेड, काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस अशा विविध पक्षांसाठी किशोर यांनी काम केले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक प्रेझेंटेशनही दाखवले होते. तेव्हा काँग्रेस व प्रशांत यांना पक्षात सहभागी होण्याची ऑफर दिली होती जी किशोर यांनी नाकारली होती. त्यानंतर आता किशोर यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version