कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. सर्वच पक्षांनी सभेंचा सपाटा लावला आहे. दरम्यान, बेळगावमधून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची बेळगावमधील सभा उधळून लावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ही सभा उधळून लावल्याची माहिती आहे.
बेळगाव जवळच्या देसूर गावात काँग्रेस उमेदवारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेत भगवे ध्वज घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य घुसले. यावेळी घोषणा देत कार्यकर्त्यांनी सभा उधळून लावली.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांसह मराठी भाषिक सभास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत सभा उधळून लावली. बेळगावमधील काही मराठी भाषिकांचा कल हा मराठी माणसांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दिशेला असून या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे देखील उमदेवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नेते काँग्रेस आणि इतर पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात जात असल्याने काही मराठी भाषिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यातूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ शिक्षकांचा मृत्यू
सुदानमधून ३,८०० भारतीय सुखरूप मायदेशी परतले
मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
सध्या कर्नाटक निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. काँग्रेस आणि भाजपा हे दोन महत्त्वाचे पक्ष पूर्ण तयारनिशी एकमेकांसमोर ठाकले आहेत.