नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर दिवंगत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या जीवनावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकातील काही भागाने नव्या चर्चेला उधाण आले आहे.
प्रणब मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा यांनी आपल्या वडिलांच्या जीवनावर ‘माय फादर : ए डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तक लिहिले आहे. शर्मिष्ठा यांच्या मते, त्यांचे वडील प्रणब मुखर्जी असे मानायचे की, राहुल गांधी यांची जिज्ञासू वृत्ती आहे. ते सतत प्रश्न विचारायचे. त्यांच्याकडे प्रश्नांचे जणू भांडारच असायचे. मात्र ते कोणत्याही एका मुद्द्यावर कायमस्वरूपी स्थिर राहात नसत. काही वेळानंतर ते दुसऱ्या मुद्द्याकडे वळत असत. प्रणबदा राहुल गांधी यांना परिपक्व राजकीय नेते मानत नसत. ही उणीव दूर करण्यासाठी त्यांनी राहुल यांना कॅबिनेटमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला होता. तो राहुल यांनी मानला नाही.
राहुल गांधी यांना अनेक विषयांत रुची होती. त्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असायचे. त्यांची उत्तरे त्यांना शोधायची असत. मात्र त्यांचे मन लगेचच एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे वळायचे. त्यांच्या याच उतावीळपणामुळे ते अन्य मुद्द्यांबाबतही मागे पडत, असेही प्रणब मुखर्जी यांनी म्हटल्याचे त्यांची मुलगी शर्मिष्ठा यांनी नमूद केले आहे.
हे ही वाचा:
दीर्घकाळापासून रचला जात होता, इस्रायलवरील हल्ल्याचा कट!
मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून सेंथिल यांची कानउघाडणी!
‘गेले ३० तास माझ्या भागात वीज नाही’
करणी सेना प्रमुखाच्या हत्याकांडातील आरोपींची ओळख पटली
‘राहुल गांधी त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी सतत राष्ट्रपती भवनात येत. तेव्हा एकदा प्रणबदांनी राहुलना सल्ला दिला की, ते देशाचे भावी नेते आहेत. त्यांना सरकार चालवण्यासाठी काही अनुभव मिळवावा लागेल. त्यासाठी त्यांनी कॅबिनेटमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला. मात्र राहुल गांधी याकडे लक्ष दिले नाही,’असे शर्मिष्ठा यांनी लिहिले आहे.