“हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत, देवाचो सोपूत घेता की…”

“हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत, देवाचो सोपूत घेता की…”

गोव्यात विधानसभा निवडणूकीत भाजपाला यश मिळाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि काही केंद्रीय मंत्री उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या सोहळ्याला उपस्थित होते.

प्रमोद सावंत यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली. प्रमोद सावंत यांच्या मंत्री मंडळात आठ जणांना संधी मिळाली आहे. विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, रवि नाईक, रोहन खंवटे, गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, सुभाष शिरोडकर, निलेश काब्राल यांनीही आज मंत्री पदाची शपथ घेतली.

हे ही वाचा:

१ एप्रिलला पंतप्रधान मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार

पोस्ट टाकली म्हणून शिवसैनिकांनी मारले

त्या ‘मातोश्रीं’ना कोटी कोटी प्रणाम!

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि सी टी रवी यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर जाऊन शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली होती. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री यांच्याशिवाय भाजपाशासित राज्यांमधील मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते.  शपथविधी सोहळ्यासाठी विशेष सुरक्षा ठेवण्यात आली असून तब्बल दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच विशेष दलाचा फौजफाटाही यावेळी तैनात करण्यात आला आहे. याशिवाय तटरक्षक दलालाही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version