पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती

पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती

काँग्रेस नेत्याने पंतप्रधानांचे कौतुक करणे ही तशी दुर्मिळच घटना पण कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याने मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. कर्नाटकमधील काँग्रेस नेते प्रमोद माधवराज यांनी पेजावर मठाचे प्रमुख विश्वेश तीर्थ स्वामीजी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात पद्म पुरस्कार देण्याचा ट्रेंड बदलला असल्याचे त्यांनी कौतुक करताना म्हटले आहे.

शुक्रवारी उडुपी येथे एका कार्यक्रमामध्ये संबोधित करताना काँग्रेस नेते प्रमोद माधवराज म्हणाले की, पूर्वी पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्यांनाच पुरस्कार दिला जाईल, असा ट्रेंड होता. मात्र, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर हा ट्रेंड बदलला आहे. जर कोणी चांगले काम केले तर त्याचे कौतुक केले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, मी दुसर्‍या पक्षाचा असलो तरी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहे.

हे ही वाचा:

चार टक्के व्याजावर पालिकेचे ‘बेस्ट’ कर्ज

मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार

शाकाहाराच्या पुरस्कारामुळे महापौरांवर मांसाहारी वैतागले

‘रझा अकादमीवर बंदी घाला’

अध्यात्माच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सोमवारी विश्वेश तीर्थ स्वामीजी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. सोमवारी राष्ट्रपती भवनात देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती भवनाच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार प्रदान सोहळा दिमाखदार सोहळ्यात पार पडला. सन २०२० साठी १४२ व्यक्तिमत्त्वांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उद्योगपती आनंद महिंद्र यांनीही पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यावर मोदी सरकारच्या निर्णयाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पद्म पुरस्कारांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल केले आहेत. गेले अनेक वर्षांपासून या बदलांची आवश्यकता होती. समाजाच्या विकासासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्या कार्याची दखल घेण्यावर या सरकारने प्रामुख्याने भर दिला आहे, अशा शब्दात महिंद्र यांनी मोदींचे कौतुक केले आहे.

Exit mobile version