‘त्या रिकाम्या खुर्चीत राऊत यांच्या चपलाही दिसतील’

मनसे नेते प्रकाश महाजन यांची टीका

‘त्या रिकाम्या खुर्चीत राऊत यांच्या चपलाही दिसतील’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, शिवसेना यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात आयुष्यात एकदाच ७१ जागा जिंकल्या होत्या. ज्यावेळी त्यांच्यासोबत आर. आर. पाटील होते मात्र त्यानंतर आजतागायत त्यांना एवढ्यांजागा जिंकता आल्या नाहीत. राज्यात स्वबळावर सत्ताही आणता आली नाही आणि तेच आता आम्हाला सांगत आहेत. आमच्यावर त्यांनी टीका करू नये, असे खडेबोल प्रकाश महाजन यांनी शरद पवारांना सुनावले आहेत. त्यांचा पक्षही साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे, असं म्हटलं तर चालेलं का? असा खोचक सवालही महाजन यांनी केला आहे. येणाऱ्या काळात शिवसेना त्या रिकाम्या खुर्चीवर राऊतांच्या चपलाही ठेवेल, असा खोचक टोला प्रकाश महाजन यांनी लगावला आहे.

प्रकाश महाजन हे माध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी शरद पवारांबद्दल वक्तव्य केलं आहे. शरद पवार साहेबांवर टीका करताना माझी खूप पंचायईत होते. त्यांच्या हजार ख्वाईश आहेत. पण त्यांची पंतप्रधानपदाची महत्त्वकांक्षा पूर्ण होत नाही. ते नेहमीच दिसतंय, असं सांगतानाच शरद पवार यांनीच राज्यातील राजकारण गढूळ करण्याचं काम केलंय, असा आरोप त्यांनी केला. मुस्लिम आमच्या दयेमुळे भारतात राहिले आहेत. त्यांना देशविरोधी घोषणा देण्याचा आधिकार नाही. ते जर आशा घोषणा देत असतील तर आम्ही विचार आणि कृतीतून त्यांचा विरोध करायला तयार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा तरुण अटकेत

मुंबई को बॉम्ब से उडा देंगे, कपडे व्यापाऱ्याला आला व्हिडीओ कॉल

हेल्पलाईन आपची आणि ताप जबलपूरच्या तरुणाला

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा काही दिवसांपूर्वीच पार पडला होता. त्यावेळी या मेळाव्यात संजय राऊत यांच्या नावे एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. यावरून महाजन यांनी शिवसेनेनवर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांची खुर्ची रिकामी ठेवण्याऐवजी त्यांनी संजय राऊतांची खुर्ची रिकामी ठेवली. येणाऱ्या काळात ते त्याच रिकाम्या खुर्चीवर संजय राऊतांच्या चपलाही ठेवतील. राऊत वाकले तर उद्धव ठाकरेंना अनेकांसमोर वाकावे लागेल, त्यामुळेच राऊतांची खुर्ची रिकामी ठेवली, अशी टीका प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Exit mobile version