“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना”

मनसे नेते प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना आहेत, असा सणसणीत टोला प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनी विशाळगडाच्या अतिक्रमणावर बोलायला हवे, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

“उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना आहेत. मुस्लीम त्यांच्या आणि ते मुस्लीमांच्या इतके प्रेमात पडले आहेत की शंकराचार्यांना घरी आणून त्यांनी पाय धुतले तरी हिंदू त्यांच्याकडे वळतील असं वाटत नाही,” अशी खरमरीत टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे.

प्रकाश महाजन असंही म्हणाले की, “संजय राऊतांनी विशाळगडाच्या अतिक्रमणावर बोलावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातील अथवा राज्याबाहेरचा कुठलाही किल्ला हा तीर्थक्षेत्र आहे. त्यावर अतिक्रमण होता कामा नये. विशाळगडावर जुन्या जागांवर अतिक्रमण झालंय आणि अतिक्रमण करणाऱ्याची बाजू घेणे म्हणजे तुम्ही बेकायदेशीरपणाला पाठिंबा देताय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांची समाधी कुठे हे कुणाला माहिती आहे का, त्यांची समाधी किती विपन्न अवस्थेत आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी विशाळगडावर सती गेल्यात. काहींना फक्त मतांचे राजकारण करायचे आहे. गजापूर गावात नवीन मुस्लीम वस्ती कुठून उभी राहते, यासिन भटकळ तिथे येऊन राहतो कसा? या गोष्टीचे तुम्ही समर्थन करताय?” असे तिखट सवाल प्रकाश महाजनांनी उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा:

२०२५ च्या आर्थिक वर्षात जीडीपी वाढ ६.५ ते ७ टक्के राहणार

देशातील परीक्षा प्रणालीवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना शिक्षण मंत्र्यांनी सुनावले

“ओबीसी आरक्षणावर शरद पवार, उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसलेत”

अडीच तास पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला…

आरक्षण मुद्द्यावरही प्रकाश महाजन यांनी मत व्यक्त केले आहे. “खरेच शरद पवारांना शांत करायचा असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी दोन्ही आंदोलकांना सोबत घ्यावे आणि साम्यजंस्याने चर्चा करावी. संवाद करावा, एकमेकांच्या गळ्यावर सुरी ठेवू नका. निष्पाप समाजघटक या आंदोलनात बळी जातोय,” असं महाजन म्हणाले.

Exit mobile version