केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा एक अनोखा अंदाज गुरुवारी पाहायला मिळाला. सचिन वाझे याच्या लेटरबॉंम्बच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषद घेत जावडेकरांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. यावेळी जावडेकर यांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’ वाला अंदाज दिसून आला.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ ची खूपच चर्चा झाली होती. पंतप्रधान मोदींविरोध्दता त्यांनी प्रचार सभा घेताना मोदींचेच काही जुने व्हिडीओ दाखवत भाजपावर टीका करायचा प्रयत्न केला. त्याचा फायदा काही झाला नसला तरीही त्यांची स्टाईल मात्र खूपच प्रसिद्ध झाली होती. गुरुवारी प्रकाश जावडेकर यांनीही पत्रकार परिषद घेताना पत्रकारांच्या संदर्भासाठी दोन व्हिडीओ लावायला सांगितले आणि पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ ही स्टाईल चर्चेत आली.
हे ही वाचा:
सर्वोच्च न्यायालयाकडूनही अनिल देशमुखांना चपराक
लूट आणि वसुली हा महाराष्ट्र सरकारचा एकमात्र कार्यक्रम
नेमके काय घडले?
गुरुवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला. बुधवारी वाझे याने लेटरबॉंम्बच्या मुद्द्यावरून जावडेकरांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.पत्रकारांशी बोलताना त्यांनी गेल्या महिन्या दोन महिन्यात झालेल्या सर्व घटनांचा लेखाजोखा मांडला. गेल्या महिन्या दोन महिन्यात घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लख्तरे निघाली आहेत. पोलीसच बॉम्ब ठेवतात हे लोकांनी पहिल्यांदा पाहिले. या सचिन वाझेचे शिवसेनेसोबत संबंध होते म्हणून सुरवातीला शिवसेना त्यांना पाठीशी घालत होती असे म्हणत पुराव्यादाखल जावडेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे वांझेची समर्थन करणारे व्हिडीओ लावून दाखवले.
हा व्हिडीओनंतर पुन्हा एकदा जावडेकरांनी ठाकरे सरकारचा समाचार घ्यायला सुरुवात केली. वाझे याने पत्रातून केलेले आरोप खूपच गंभीर आहेत. त्याने तीन मंत्र्यांची नावे घेऊन अडीचशे कोटीची वसुली करायला सांगितल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकारने जनतेला सांगितले पाहिजे की त्यांचा नेमका कार्यक्रम काय आहे? फक्त लूट करायला ते सत्तेत आले आहेत का? लूटी व्यतिरिक्त ते महाराष्ट्रात काय करत आहेत असा सवालही जावडेकरांनी केला.
महाराष्ट्र सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाहीये. शिवसेना आमच्यासोबत निवडणूक लढली. मोदींच्या नावावर लोकांनी त्यांना मतं दिली. पण नंतर ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले अशा दोन पक्षांसोबत शिवसेना गेली आणि सरकार स्थापन केले. कारण लूट हाच त्यांचा समान कार्यक्रम होता असे जावडेकर म्हणाले.