महाराष्ट्र भाजपा सोशल मीडिया सेलच्या संयोजक पदी प्रकाश गाडे

महाराष्ट्र भाजपा सोशल मीडिया सेलच्या संयोजक पदी प्रकाश गाडे

जितेन गजारिया यांच्याकडे प्रभारी पद

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र सोशल मीडिया संयोजक पदी प्रकाश गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. तर गाडे यांच्या आधी संयोजक असलेले जितेन गजारिया यांना सोशल मीडिया सेलचे प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. तर आयटी सेलची धूरा सतीश निकम यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

सध्याच्या जमान्यात सोशल मीडिया आणि आयटी सेल हा प्रत्येक राजकीय पक्षाकक्सचे महत्वाचे अंग मानले जाते. भारतीय जनता पार्टी तर फार आधीपासून सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी प्रसिद्ध आहे. तर भारतातील राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावरील योध्यांची सर्वात मोठी फळी ही भाजपाकडे असल्याचे मानले जाते.

हे ही वाचा:

आशिष शेलारांना शांत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?

मूळ मुद्द्यावरून दुर्लक्ष करण्यासाठी दाखल केला गुन्हा

पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन

प्रकाश गाडे हे आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि तडफदार लेखणीसाठी प्रसिद्ध आहेत. तर त्यांचा जमिनीवरील कार्यकर्त्यांशीही चांगला संपर्क असतो. त्यामुळे गाडे यांची नियुक्ती ही एका सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने विश्वास दाखवत मोठी जबाबदारी दिल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.

तर या सोबतच दिव्या ढोले यांच्याकडे सोशल मीडिया आणि आयटी सेलचे पालकत्व देण्यात आले आहे. तर समीर गुरव यांना सोशल मीडियाचे सह प्रभारी आणि आयटी सेलचे प्रभारी करण्यात आले आहे.

Exit mobile version