प्रकाश आंबेडकरांच्या विधानामुळे मविआमध्ये खडाखडी

शरद पवार हे भाजपाचे आहेत, असे प्रकाश आंबेडकरांनी केले होते वक्तव्य

प्रकाश आंबेडकरांच्या विधानामुळे मविआमध्ये खडाखडी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच युतीची घोषणा झाली पण त्याला काही तास लोटत नाहीत तोवरच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्याच्या मुद्द्यावरून आंबेडकरांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे या युतीला महाविकास आघाडीत स्थान आहे की नाही यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युती झाल्याची घोषणा केली. तेव्हा महाविकास आघाडीत स्थान मिळण्याबाबत त्यांनी चेंडू मविआच्या कोर्टात ढकलला. त्यांची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले पण महाविकास आघाडीतील एक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांबाबत त्यांच्या मनात असलेली अढी पुन्हा एकदा स्पष्ट झाली.

हे ही वाचा:

दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन

१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी

लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण

पंतप्रधान मोदींनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली

पत्रकारांशी बोलताना शरद पवार हे भाजपाचे आहेत, असे ते म्हणाले तसेच ते लेफ्टला पाहतात आणि राईटला हात देतात, असेही विधान त्यांनी केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली आहे. त्यामुळे या युतील महाविकास आघाडीत स्थान असेल का, राष्ट्रवादी काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना स्वीकारणार का, की त्यातून मविआ आणि या युतीत दुरावा निर्माण होणार असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना थेट न बोलता महाविकास आघाडीचा भाग व्हायचे असेल तर त्यामधील प्रमुख नेत्यांविषयी टीकात्मक बोलू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे सदस्य व्हावेत अशी आमची इच्छा आहे पण आघाडीतील प्रमुख नेत्यांवर आदर ठेवूनच बोलले पाहिजे. शरद पवारांच्या बाबतीत प्रकाश आंबेडकरांचे काही मतभेद असतील पण ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू.

Exit mobile version