मविआमध्ये एकोपा नाही; प्रकाश आंबेडकरांचा घाणाघात

वंचित काँग्रेसला सात जागांवर देणार पाठींबा

मविआमध्ये एकोपा नाही; प्रकाश आंबेडकरांचा घाणाघात

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असताना राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे मतविभाजन टाळण्यासाठी ‘मविआ’कडून वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळत आपल्या उमेदवारांची घोषणा केली. शिवाय त्यांनी मविआबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीकास्त्रही डागले.

महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे अशांसोबत आम्ही पुन्हा जाऊन बिघाड घालणे योग्य नाही. परंतु, काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सात जागांवर पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. काँग्रेसने सातपैकी दोन जागांची नावे सांगितली असून त्यानुसार नागपूर आणि कोल्हापूरला वंचितचा उमेदवार न देता पाठिंबा दिला आहे. अन्य पाच जागांवर काँग्रेसकडून सांगण्यात येईल असेही आंबेडकर म्हणाले. वंचित या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघ लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रस्थापितांविरोधात विस्थापित अशी ही निवडणूक होणार आहे. प्रस्थापित पक्ष आणि नेत्यांना वंचित उमेदवारांना समोर येऊ द्यायचे नसल्यानेही ‘मविआ’सोबत जाता आले नाही असा आरोपही आंबेडकर यांनी केला. आघाडीची बोलणी सुरू असताना २७ जागांवरील उमेदवारांची यादी दिली होती. या जागांचा आम्ही अभ्यास केला होता. आता त्याला कुणी गांभीर्याने घेतले नाही असेही आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीत एकोपा नसल्याचेही वंचितचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा :

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार

काँग्रेसने भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले; पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्याला मारहाण; ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बारामतीमधून सुप्रिया सुळे तर शिरूर मधून अमोल कोल्हे लोकसभेच्या रिंगणात

निवडणूक रोख्यांचा भ्रष्टाचार, हुकूमशहा मोदी आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हे विषय घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये उतरणार आहोत. निवडणूक जशी जवळ येईल तशी भाजप आणि वंचित यांच्या उमेदवारातच लढत असल्याचे दिसून येईल असेही आंबेडकर म्हणाले. निवडणुकीवर राम मंदिराचा मुद्दा प्रभावी ठरणार नसून महागाई, बरोजगारी हे प्रमुख मुद्दे असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

Exit mobile version