भारतररत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांसाठी मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय जनता दल या दोन पक्षांसोबत युतीची घोषणा केली आहे. तर त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेलाही साद घातली आहे. आम्ही शिवसेनेसोबत युती करायला तयार आहोत पण शिवसेना आमच्या सोबत येईल का? हा प्रश्न आहे असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
शिवसेनेसोबत युती करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्णय हा शिवसेना पक्ष आता सेक्युलर झाल्याने घेतल्याचे दिसून येते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना या सेक्युलर पक्षासोबत युती करण्याची तयारी असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. तर काँग्रेस सोबतही युती करण्याची त्यांची तयारी असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
अंधेरीतील बारच्या तळघरातून १७ मुलींची सुटका
‘म्हणून’ फ्रांससाठी रविवार ठरला ऐतिहासिक
श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान
आगामी काळात महाराष्ट्रातील महत्वाच्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष या निवडणुकांच्या रिंगणात संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे. मध्यंतरीच्या काळात प्रकाश आंबेडकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणापासून थोडे दूर दिसले होते. पण ता पुन्हा एकदा ते सक्रिय होताना दिसत आहेत.
लवकरच राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीगसोबत जागा वाटप पूर्ण करणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी एमएम पक्षावर टीकास्त्र डागले आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षाची आधी एमआयएम सोबत युती होती.