प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकले

औरंगजेब मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना या भेटीची चर्चा

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकले

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवार, १७ जून रोजी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. राज्यात काही दिवसांपासून औरंगजेब या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना प्रकाश आंबेडकर यांच्या या भेटीमुळे भुवया उंचावल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन प्रकाश आंबेडकर यांनी फुले अर्पण करून कबरीला नमन केल्याचेही पाहायला मिळाले. या भेटीमुळे राज्यात राजकीय वाद निर्माण होईल का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की, “औरंगजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते मिटवणार आहात का?’ तसेच राज्यात औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवण्यावरून होत असलेल्या वादावर ते म्हणाले की, “माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर दोन दिवसात हे प्रकरण मार्गी लावलं असतं. वाद होऊ देता म्हणून होतात. जयचंद इथे आले आणि साऱ्या राज्या- राज्यात झाले. त्या जयचंदाना शिव्या घाला, त्या औरंगजेबाला कशाला शिव्या घालताय?,” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याने ठाकरे गटाची कोंडी होऊ शकते का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अजिबात नाही, असं उत्तर दिलं. “औरंगाबाद हे दुसरी राजधानी व्हावी हे तुघलकापासून आहे. लोकांचा सेकंड कॅपिटलला विरोध असेल तर माझं म्हणणं आहे, महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा. सांगावं की, औरंगाबाद, खुलताबाद हा भाग भारताची दुसरी राजधानी म्हणून जाहीर करावी”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा:

मणिपूर अजूनही धुमसतेच, १० हजारांहून अधिक घरे पेटली

पळवून नेलेल्या हिंदू तरुणीचा ‘निकाह’ पोलिसांनी रोखला

मदरशात शिक्षण घेण्यासाठी बिहारमधून आलेल्या मुलांना परत पाठवले!

अनधिकृत दर्गा हटविण्याच्या नोटिशीनंतर मुस्लिमांची पोलिसांवर दगडफेक

काही दिवसांपूर्वीचं राज्यात औरंगचेबाचे पोस्टर आणि सोशल मीडिया स्टेटसवरून वातावरण तापलं होतं. अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत होते. त्यावर  प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. “औरंगजेब या मातीतला आहे. औरंगजेब कुठून पैदा झाला असं विचारत आहेत, दुसरीकडे कुठे पैदा झाला असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी सांगावं.” त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अशाच आशयाचं वक्तव्य पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं आहे.

Exit mobile version