लोकसभा निवडणुकीचा महानिकाल मंगळवार, ४ जून रोजी समोर येत आहे. देशासह जगाचे लक्ष असलेल्या या निकालाचा अपडेट समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत देशातील पहिला निकाल कर्नाटकातून समोर आला आहे. जनता दल धर्मनिरपेक्षचे (जेडीएस) नेते प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला आहे.
हसन लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल हे विजयी झाले आहेत. १६ वी फेरी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल हे एनडीएचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात ४१,७८२ मतांनी आघाडीवर आहेत. श्रेयस यांना ६,१२,४४८ मते मिळाली, तर प्रज्वल यांना ५,७०,६६६ मते मिळाली आहेत.
हासन मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांना लैंगिक छळ प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. रेवण्णा यांना ६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेत आणखी एक भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता!
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा धडा!
निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांनी एक आठवड्याची मागितलेली मुदत नाकारली
मुख्य प्रशिक्षक म्हणून टी २० विश्वचषक ही द्रविडची शेवटची स्पर्धा!
प्रज्ज्वल हे माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांचे नातू आणि माजी मंत्री एचडी रेवण्णा यांचे पुत्र आहेत. जेडीएस हा एनडीएचा घटकपक्ष असून प्रज्वल हे जेडीएसकडून हसन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत होते. मतदानानंतर त्यांनी देशातून पलायन केले होते. सेक्स टेप आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रज्वल अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी सध्या ते अटकेत आहेत.