राज ठाकरेंना दिला पाठिंबा
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेल्या भाषणानंतर महाराष्ट्रातील वातावरण बदलले असून आता राज ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची कलाकार प्राजक्ता माळी हिनेही राज ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी जो भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे त्यावरून प्राजक्ताने ट्विट करत राज ठाकरे यांचे समर्थन केले आहे. तिने यासंदर्भात जी पोस्ट केली होती, त्यात म्हटले होते की, सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना, सगळ्यांना अक्षय्य तृतियेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा.
(आज सोने खरेदीचा दिवस अंगावर सर्वाधिक सोने असलेला फोटो टाकतेय.)
असो…
आज ३ तारीख. उद्यापासून गोंगाट बंद होईल, अशी आशा बाळगते. #शांतताप्रिय # त्रस्तनागरिक
धन्यवाद मा. श्री. राज ठाकरे
सगळ्यांसाठी…
परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूंच्या महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून ऊर अभिमानाने भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली.
हल्ली अशाप्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं?
खूप धन्यवाद.
हे ही वाचा:
मनसे आंदोलनामुळे पोलीस ऍक्शन मोडमध्ये
राहुल गांधींचा क्लबमधला व्हिडीओ व्हायरल
अक्षय तृतियेच्या दिवशी मनसे कार्यकर्त्यांच्या घरी धडकले पोलिस
चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा
नंतर प्राजक्ताने ही पोस्ट एडिट करून त्यातील बराचसा मजकूर वगळला. मात्र तोपर्यंत तिची पहिली पोस्ट सगळीकडे व्हायरल झाली.
एडिट केलेल्या पोस्टमध्ये तिने बराचसा भाग वगळून शेवटी फक्त असो. आज ३ तारीख असे म्हणत पोस्ट संपविली आहे.
प्राजक्ता माळीने शिवाजी पार्कला गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या मेळाव्यात भाग घेतला होता. पण त्यावेळी तिने पक्षात प्रवेश केल्याची चर्चा होती.